पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्याला अटक

केतकी चितळे

अभिनेत्री केतकी चितळे हिला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांपैकी एकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला औरंगाबाद येथून पकडले. हिंदी भाषेत बोलली म्हणून केतकीला नेटकऱ्यांनी अश्लील भाषेत ट्रोल केले. यात अश्लील भाषेचा वापर तसेच शिवीगाळही करण्यात आली होती. 

केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ट्रोल करणाऱ्यांवर गुन्हे दखल करण्याची मागणी तिने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पोलिसांच्या कारवाईनंतर एका व्यक्तीला औरंगाबादमधून अटक केली. 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेत

काही दिवसांपूर्वी केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने हिंदी भाषेतून तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी तिने हिंदी ही आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे असंदेखील म्हटलं होतं. हाच मुद्दा धरून तिला अनेक युजर्सनं अश्लील शब्दात ट्रोल केले होते. 

मलायकानं अखेर अर्जुनसोबतचं नातं केलं मान्य

अश्लील ट्रोलिंग प्रकरणी तिनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेतली होती. तिला करण्यात आलेल्या ट्रोलिंगला ती ज्या धाडसानं सामोरी गेली याबद्दल केतकीचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं. मात्र तिच्या हिंदी भाषेबद्दलच्या मताविषयी असहमत असल्याचंही  मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलं होतं.