पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

KBC ११: 'या' प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने सोनाक्षी झाली ट्रोल

केबीसी 11

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. सोनाक्षी सिन्हा 'कोण बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या ११ व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला देता आले नाही. 'हनुमान कोणासाठी संजीवनी बूटी घेऊन आले होते.' हा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला होता. याचे उत्तर सोनाक्षीला देता न आल्यामुळे ती सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.

'कोन बनेगा करोडपती'मध्ये शुक्रवारी कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये राजस्थानच्या रुमा देवी सहभागी झाल्या होत्या. रुमा देवी यांना २०१८ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारी शक्ती पुरस्कार' देण्यात आला होता. रुमा देवी यांनी २२ हजार महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा रुमा देवी यांच्या कामामुळे खूप प्रभावित झाली आणि ती रुमा देवी यांच्या प्रोडक्टची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली. रुमा देवी यांच्यासोबत सोनाक्षी सिन्हा कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

या कार्यक्रमात सोनाक्षीला 'हनुमान कोणासाठी संजीवनी बूटी घेऊन आले होते.' या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने तिला लाइफ लाइनचा वापर करावा लागला. त्यामुळे सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. एका ट्रोलरने असे म्हटले आहे की, 'सोनाक्षीच्या वडिलांचे नाव शत्रुघ्न. काकाचे नाव राम, लक्ष्मण, भरत. भावांचे नाव लव आणि कुश. त्यांच्या बंगल्याचे नाव रामायण. असे असताना सोनाक्षी सिन्हाला हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणले हे माहिती नाही.' असा सवाल केला आहे. तर अनेक जणांनी सोनालीला बॉलिवूडची आलिया भट्ट असे देखील म्हटले आहे.