पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

KBC ११ : महिन्याला दीड हजार कमावणाऱ्या बबिता कोट्यधीश

बबिता ताडे

लोकप्रिय कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती'चा ११ वा सीझन सध्या सुरू आहे. ११ व्या सीझनमध्ये सनोज राज या स्पर्धकानं १ कोटी रुपये जिंकले आहेत. सनोजनंतर महाराष्ट्राच्या बबिता ताडे या १ कोटी जिंकणाऱ्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या आहेत. 

आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'ची बॉक्स ऑफिसवर चलती

एका सरकारी रुग्णालयात स्वयंपाक करण्याची जबाबदारी बबिता यांच्यावर आहे. या नोकरीतून त्या महिन्याला केवळ दीड हजार रुपये कमावतात. या खेळात आपल्या ज्ञानाच्या जोरावार त्यांनी १ कोटींपर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे जिंकलेल्या रकमेतून थोडे पैसे खर्च करून एक मोबाईल फोन घेण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

आर्थिकस्थिती बेताची असल्यानं घरात मोबाईल नाही. घरात एकच मोबाईल फोन आहे. त्यामुळे अडीअडचणीला संपर्क साधण्यासाठी मी जिंकलेल्या रकमेतून एक मोबाईल विकत घेईन असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांचा तोच साधेपण  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आणि ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनाही भावला होता.