जान्हवी कपूर परिधान करत असलेल्या अत्यंत तोकड्या शॉर्ट्स पाहून मला कधी कधी तिची खूपच काळजी वाटते असं नुकतंच कतरिना कैफ एक चॅट शोमध्ये म्हणाली. नेहा धुपियाच्या बीएफएफ विथ वोग चॅटशोमध्ये कतरिना आली होती यावेळी तिनं काळजी व्यक्त केली.
कोणत्या अभिनेत्रीचा जिम लूक तुला आवडतो असा प्रश्न कतरिनाला नेहानं विचारला होता. यावर जान्हवी परिधान करत असलेल्या अत्यंत तोकड्या शॉर्ट्समुळे मला तिची कधी कधी खूप काळजी वाटते असं कतरिना म्हणाली असल्याचं डीएनएनं म्हटलं आहे.
MeToo च्या आरोपांतून दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चिट
मी ज्या जिममध्ये जाते त्या जिममध्ये जान्हवी येते, आम्ही कधीतरी एकत्रही असतो मात्र मला तिची खूपच काळजी वाटते असं म्हणत या चॅटशोमध्ये कतरिनानं नेहाजवळ आपली काळजी व्यक्त केली.
कतरिना सध्या सलमान खान सोबत 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. पुढील आठवड्यात 'भारत' चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कतरिना मुख्य भूमिकेत आहे.