पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारत'मधील भूमिका आणि सलमानच्या मैत्रीचा संबंध नाही, कतरिना कैफ

सलमान खान आणि कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता सलमान खान यांच्यातील नात्याबद्दल अनेकवेळा चर्चा होत असते. या दोघांनी मिळून आतापर्यंत सहापेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. आता कतरिना कैफ सलमानच्याच आगामी भारत चित्रपटामध्ये भूमिका साकारते आहे. यावरून सिनेरसिकांमध्ये चर्चा सुरू झाल्यावर कतरिनाने तिची बाजू मांडली आहे. 

सलमानशी असलेली मैत्री आणि भारतमधील भूमिकेचा काहीही संबंध नाही. भारतचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी मला सिनेमाची स्क्रिप्ट वाचायला दिली होती. ती वाचल्यानंतर अवघ्या तीन तासांत मी या सिनेमामध्ये काम करायला होकार दिला, असे कतरिनाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

कतरिना म्हणाली, अली अब्बास जफर आणि मी चांगले मित्र-मैत्रिण आहोत. पण जेव्हा कामाचा विषय येतो. त्यावेळी आम्ही दोघेही एकमेकांच्या स्वातंत्र्याचा विचार करतो. भारतची स्क्रिप्ट मी तीन तासांत वाचून पूर्ण केली. आणि लगेचच मी अलीला फोन केला आणि स्क्रिप्ट खूप आवडल्याचे सांगितले. भारतमधील भूमिकेतून माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मला मिळते आहे, असे जाणवले आणि म्हणूनच मी हा सिनेमा करण्याचे ठरवले. सलमानची आणि माझी मैत्री याचा या सिनेमातील भूमिकेशी काहीही संबंध नाही. मी हा सिनेमा करण्याचे निश्चित झाल्यापासून सलमानचे आणि माझे बोलणेही झालेले नाही, असेही तिने सांगितले.

सध्या माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामाकडे लागले आहे. अनेकांकडून माझ्या कामाचे कौतुक केले जात आहे. त्यामुळे मला आनंदच झाला आहे. याचे सर्व श्रेय आनंद राय सरांना जाते. त्यांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवायला सांगितला आणि चितेंतून सावरण्यासाठी मला खूप मदत केली, असे कतरिना म्हणाली.