पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते...

सलमान खान- कतरिना कैफ

सलमान खान आणि कतरिना कैफ ही रुपेरी पडद्यावरची चाहत्यांची आवडती जोडी आहे.  ऐकेकाळी ही जोडी एकमेकांना डेट करत होती अशाही चर्चा होत्या. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना अभिनेता रणबीर कपूरला डेट करू लागली. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. 

ड्रिम गर्ल : 'ढगाला लागली कळ' गाणं हटवण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात कतरिनानं नुकतीच उपस्थिती लावली. यावेळी सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिनानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सलमान हा माझा सच्चा मित्र असल्याचं कौतुक कतरिनानं केलं आहे. 'माझी आणि सलमानची मैत्री गेल्या १६ वर्षांपासून टिकून आहे. तो एक सच्चा मित्र आहे. ज्यावेळी तुम्ही संकटात असाल त्यावेळी धावून येणाऱ्या मित्रांपैकी तो एक आहे. तो सतत संपर्कात नसेल मात्र गरज असेल तेव्हा तो मदतीला नक्की धावून येतो', असं कौतुक कतरिनानं केलं आहे.

रणवीर सिंगच्या 'गल्ली बॉय' चित्रपटाची ऑस्कर वारी

सलमान आणि कतरिना जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटात एकत्र दिसले होते. या जोडीनं मैने प्यार क्यु किया, पार्टनर,  एक था टायगर, टागर झिंदा है चित्रपटात एकत्र काम केलं आहे.