पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाहिरातींसाठी कतरिनाच्या मानधनात 40% अतिरिक्त वाढ देण्यास ब्रँड तयार?

कतरिना कैफ

'भारत' चित्रपटाच्या यशानंतर कतरिना कैफच्या  लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे. कतरिना ही आजच्या काळातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे पण त्याचसोबत ती अनेक प्रसिद्ध ब्रँडची सदिच्छादूत देखील आहे. अनेक ब्रँडनं तिला  तिच्या मूळ मानधनापेक्षा ४०% अतिरिक्त मानधन वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. डीएनए या वृत्तपत्रानं ही माहिती दिली आहे. 

कंगना वादावर बालाजी टेलीफिल्म्सनं मागितली पत्रकारांची माफी

कतरिनाची लोकप्रियता अधिक आहे. ही लोकप्रियता पाहता अनेक फूड अँड ब्रेव्हरेज, लाइफस्टाइल ब्रँडनं तिच्या मूळ मानधनापेक्षा  ४० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त मानधन वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये हृतिकसोबत दिसणार दीपिका?

जाहिरात विश्वात ब्रँडच्या जाहिरातींसाठी लोकप्रिय सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांना नेहमीच प्रसिद्धी असते. यासाठी ब्रँड कित्येक कोटींचं मानधन मोजण्यास तयार असतात. कतरिनाची लोकप्रियता पाहता तिला  अनेक ब्रँडच्या जाहिराती येत आहेत. कतरिनाचा होकार मिळावा यासाठी जास्त मानधन मोजण्याची तयारी आता ब्रँडनं दर्शवली आहे.