पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर प्रश्न निकाली लागायला सुरूवात झालीये - अनुपम खेर

अनुपम खेर

काश्मीर प्रश्नावर  आता मार्ग निघायला सुरूवात झाली आहे असं ट्विट करून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. काश्मीर प्रश्नी महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीनं घडामोडींना वेग आला आहे. 

अटलबिहारी वाजपेयींची आज उणीव भासत आहेः मेहबूबा मुफ्ती

काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर आता मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं  आहे. राज्यातील इंटरनेट आणि फोन सेवाही खंडीत करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

काश्मीर 'इफेक्ट':सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी 

या पाश्वभूमीवर अनुपम खेर यांनी मध्यरात्री ट्विट केलं. काश्मीर प्रश्न निकाली लागेन अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. अनुपम खेर हे काश्मिरी पंडीत आहे. यापूर्वी अनेकदा त्यांनी  कलम ३७० रद्द करण्याविषयी आपलं मतप्रदर्शन केलं होतं.  काश्मीरमधील पंडितांना सहन कराव्या लागलेल्या अत्याचारांविषयी त्यांनी अनेकदा आपलं मत मांडलं होतं. जर ३७० रद्द झालं तर सर्व समस्या सुटतील असं ते यापूर्वी म्हणाले होते.