पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : सारा- कार्तिकच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित

लव्ह आज कल

दीपिका- सैफ अली खानचा २००९ साली आलेला 'लव्ह आज कल' हा चित्रपट तेव्हा  सुपरडुपर हिट ठरला होता. काळानुसार बदलत जाणाऱ्या नात्याच्या व्याख्या ते मनात सुरु असलेला प्रेमाचा एक एक गुंता सोडवण्याची कहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता या चित्रपटाचा ११ वर्षांनी सीक्वल येत आहे.  अर्थात चित्रपटाचं नाव तेच ठेवण्यात आलं आहे. 

अभिनेत्याला चाहतीकडून त्रास, कौटुंबिक जीवनावर परिणाम

इम्तिआज अली दिग्दर्शित आणि सारा अली खान- कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेल्या या  चित्रपटाचा पहिला ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करिअरला प्राधान्य देणारी एक महत्त्वाकांक्षी मुलगी झोई आणि तिच्यावर जीवापाड  प्रेम करणाऱ्या वीरची ही कहाणी आहे. काळ बदलला तशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या, नेमका हाच विषय इम्तिआज अलींनी या चित्रपटातून अधोरेखित केला आहे. 

Video : पूजाची एक झलक पाहण्यासाठी त्यानं पाच दिवस रस्त्यावर काढले

नव्या चित्रपटाची कथा पूर्वीसारखी भविष्य आणि भूतकाळाभोवती फिरणार आहे. विशेष म्हणजे सारा- कार्तिकची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.