पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिकची वर्णी, होणार 'सीक्वलचा राजा'

भूल भुलैया २

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या  भलताच लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे या वर्षांत कार्तिकच्या वाट्याला दोन सीक्वल आणि एक रिमेक आला आहे.  सोन्याहून पिवळं म्हणजे अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट 'भूल भुलैया'च्या सीक्वलमध्ये कार्तिकची वर्णी लागली असल्याचं समजत आहे. बॉलिवूडमधला सीक्वलचा ट्रेंड पाहता गेल्या काही  दिवसांपासून 'भूल भुलैया २'  येणार अशा चर्चा होत्या.  मुंबई मिररच्या वृत्तानुसार 'भूल भुलैया'च्या सीक्वलमध्ये  कार्तिक पहायला मिळणार आहे. कार्तिकनंही याला होकार दिला आहे. 

अक्षय कुमारचा महिन्याचा खर्च फक्त .....

आता कार्तिकच्या वाट्याला 'दोस्ताना २', 'लव्ह आज कल २' आणि 'भूल भुलैया २'  असे तीन सीक्वल आले आहेत. तेव्हा कार्तिक हा सध्याच्या घडीला बॉलिवूडमधला नवा 'सीक्वलचा राजा' ठरला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'भूल भुलैया २'   चित्रपटाच्या स्क्रीप्टवर सध्या काम सुरू आहे. कार्तिकला सीक्वलची कल्पना आवडली आहे आणि कार्तिकनं होकार दिला आहे असं वृत्त मुंबई मिररनं सुत्राच्या हवाल्यानं दिलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार हे अद्यापही ठरलं नाही तसेच इतर स्टारकास्टचाही विचार व्हायचा आहे असंही समजत आहे. 

'Taarak Mehta ka Ooltah Chashmah' मध्ये दिशा वाकानीची एंट्री नाहीच

२००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख  भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतलं सुशिक्षित जोडपं सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परततं. या घरातील बंद खोलीत  भूतकाळातील कटु आठवणी बंद असतात. या आठवणीतून सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला  होता. हॉरर कॉमेडी प्रकारातल्या या चित्रपटानं तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली  होती.