पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूल भुलैया २' या तारखेला होणार प्रदर्शित

भूल भुलैया २

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या 'भूल भुलैया २' ची अखेर अधिकृत घोषणा झाली आहे. जवळपास १३ वर्षांनंतर अक्षय कुमार- विद्या बालनच्या 'भूल भुलैया'चा सीक्वल येत आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

बिग बॉस मराठी २ : हीना पांचाळ घराबाहेर

कार्तिकनं त्याचा  चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. ३१ जुलै २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. २००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, शायनी आहुजा, अमिशा पटेल यांची प्रमुख  भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोघांची किनार या चित्रपटाला होती. अमेरिकेतलं सुशिक्षित जोडपं सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी भारतातील आपल्या घरी परततं. या घरातील बंद खोलीत  भूतकाळातील कटु आठवणी बंद असतात. या आठवणीतून सुरू झालेला अंधश्रद्धेचा खेळ आणि त्यातून संपूर्ण कुटुंबाला बाहेर काढणार मानसोपचारतज्ज्ञ साधरण अशा कथेवर हा चित्रपट आधारलेला  होता. 

'लस्ट स्टोरीज्'नंतर नेटफ्लिक्सवर 'घोस्ट स्टोरीज्', जान्हवी प्रमुख भूमिकेत

'भूल भुलैया २'  बरोबरच पुढील वर्षभरात कार्तिकचे 'दोस्ताना २', 'लव्ह आज कल २', 'पती पत्नी और वौ' हे चित्रपट देखील प्रदर्शित होत आहेत.