पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IT'S OFFICIAL : 'दोस्ताना २' येणार, जान्हवी-कार्तिक प्रमुख भूमिकेत

कार्तिक जान्हवी

गेल्या वर्षभरापासून 'दोस्ताना २' येणार असल्याच्या चर्चा होत्या. करणनं तेव्हा या चर्चा नाकारल्या होत्या. आता मात्र करणनं 'दोस्ताना २' ची अधिकृत घोषणा केली आहे. जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तर तिसऱ्या कलाकाराचा शोध अद्यापही सुरू आहे. 'दोस्ताना २' मधला तिसरा कलाकार हा  नवा चेहरा असणार आहे. 

२००८ मध्ये करण जोहरचा 'दोस्ताना' प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आणि त्यातली गाणी सुपरहिट ठरली होती. समलैंगिक सबंध, प्रेम, मैत्री यावर आधारित हा चित्रपट होता. मात्र या तिन्ही विषयाची मांडणी करणनं अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीनं केली होती. त्याला विनोदाचा अन् रोमान्सचा तडका होता. प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम या तिघांची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. ११ वर्षांचा काळ लोटला तरी या चित्रपटातील 'देसी गर्ल' गाणं हे आजही तितकंच सुपरहिट आहे. या गाण्यानंतर प्रियांका खऱ्या अर्थानं 'देसी गर्ल' हे बिरुद मिरवू लागली. डिसेंबर २०१८ पासून या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली आहे.  

'दोस्ताना २' च्या निमित्तानं जान्हवी आणि कार्तिक पहिल्यांदा एकत्र काम करत आहे. या चित्रपटातील तिसऱ्या अभिनेत्याचा शोध चालू आहे. त्यामुळे 'दोस्ताना २' मधून कोणता नवा  अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे पाहण्यासारखं ठरेन.