कार्तिक आर्यन आणि सारा अली खान 'लव्ह आज कल' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई, दिल्ली अशा विविध शहरात सुरू आहे. सारा आणि कार्तिकची जोडी प्रेक्षकांनाही खूपच आवडत आहे.
ही जोडी नुकतीच मुंबईतील एका दर्ग्यात दर्शनासाठी पोहोचली होती. कोणीही ओळखू नये यासाठी दोघांनी आपला चेहरा झाकला होता. त्यामुळे कोणालाही ही जोडी ओळखू आली नाही. दर्शन झाल्यानंतर कार्तिकनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सारासोबतचा फोटो शेअर केला.
ईदच्या निमित्तानं हे दोघंही दर्ग्यात आले होते. सारानं कार्तिक आणि आईसोबत ईद साजरी केली आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. 'केदारनाथ' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सारा अली खाननं वडील सैफ अली खानसोबत कॉफी विथ करण शोमध्ये उपस्थिती लावली होती. या शोमध्येच तिनं कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छादेखील बोलून दाखवली होती. तेव्हापासून या जोडीची चर्चा आहे.