पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गंगूबाई कोठेवाली'मध्ये आलियासोबत कार्तिक दिसणार या निव्वळ अफवा

कार्तिक आर्यन

संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई कोठेवाली' या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. या चित्रपटात आलिया भट्ट ही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात आलियासोबत कार्तिक आर्यनही दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र भन्साळी निर्मिती संस्थेच्या सीईओ प्रेरणा सिंह यांनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. 

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या दोन अभिनेत्रींना होती भन्साळींची सर्वाधिक पसंती

कार्तिक या चित्रपटात दिसणार अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत मात्र या चर्चांमध्ये काही तत्थ नाही. कार्तिकला कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही, असं प्रेरणा म्हणाल्या. तसेच कार्तिकला त्याच्या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. कार्तिकचा 'पती, पत्नी और वो ' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी त्याचे  'भुल भुल्लैया २'  आणि 'दोस्ताना २' हे चित्रपटही प्रदर्शित होत आहे.

अक्षयचा 'गोल्ड' चीनमध्ये होणार प्रदर्शित

कोण आहेत गंगूबाई
पत्रकार हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'  या कांदबरीत  गंगूबाई यांच्याविषयी लिहलं गेलं आहे. नवऱ्यानं फसवून त्यांना देहविक्रेय करणाऱ्या महिलेला विकलं होतं. सधन  कुटुंबातून आलेल्या गंगूबाईचं कमी वयात आयुष्य उद्धवस्त झालं.  गंगूबाईंच्या परतीचे दरवाजे बंद झाले. देहविक्रेय करायला नशीबानं भाग पाडलं असलं तरी  पुढे  याच गंगूबाई देहविक्रेय करणाऱ्या महिलांसाठी आशेच्या किरण ठरल्या होत्या. मनाविरुद्ध या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलींची सुटका करून त्यांना गंगूबाई घरी पाठवून दयायच्या.

पहाटे ३ वाजता उठून दाखव, कपिलचं अक्षयला चॅलेंज