पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भूल भुलैया २ : जानेवारी महिन्यात पुढील चित्रीकरणाला होणार सुरुवात

भूल भुलैया २

भूल भुलैया २ चं पहिल्या भागातील चित्रीकरण पार पडलं आहे. आता उर्वरित चित्रीकरणाला जानेवारी महिन्यापासून सुरुवात होणार आहे. हे चित्रीकरण ३ महिन्यांपर्यंत चालणार असून चित्रीकरणासाठी संपूर्ण स्टारकास्ट उपस्थिती असणार आहे. याआधी   कार्तिक आणि किआराची काही मोजकी दृश्य चित्रीत करण्यात आली होती. 'भूल भुलैया २' च्या चित्रीकरणाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात झाली होती. 

बॉबी म्हणतो, मुलाला अभ्यासात अधिक रस याचा अभिमान

 जानेवारी २०२० मध्ये उर्वरित चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे अशी माहिती भूल भुलैया २ च्या दिग्दर्शकांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.  तीन महिन्याच्या काळात लंडन आणि राजस्थानमध्ये  भूल भुलैया २ चं उर्वरित चित्रीकरण पार पडणार आहे. या चित्रपटात कार्तिक  आर्यन, किआरा अडवाणीसोबत अभिनेत्री तब्बूही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. जुलै २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

अनाथ मुलांसाठी सौरउर्जा प्रकल्प, उद्धाटनासाठी सई मांजरेकर फलटणमध्ये

२००७ साली प्रदर्शित झालेला 'भूल भुलैया' चा 'भूल भुलैया २' सीक्वल आहे. 'भूल भुलैया' मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, अमिशा पटेल, शायनी आहुजा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट रजनीकांत यांच्या  तमिळ चित्रपट 'चंद्रमुखी'चा रिमेक होता. 'भूल भुलैया' हा तेव्हाचा सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्यामुळे साहजिक 'भूल भुलैया २' कड़ून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kartik Aaryan and Kiara Advani to kick off second schedule in January 2020 Bhool Bhulaiyaa 2