पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉलिवूड निर्मात्याच्या मुलींना कोरोना

झोआ मोरानी

बॉलिवूड निर्माते करिम मोरानी यांची मुलगी झोआ मोरानी हिला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोमवारी तिची छोटी बहिणी शाजा हिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ती श्रीलंकेतून परतली होती. तर झोआ मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. तिचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर आज 'जब वी मेट'मध्ये शाहिदऐवजी दिसला असता हा अभिनेता

‘शाजा नानावटी रुग्णालयात दाखल असून झोआला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा शाजाची करोना चाचणी केली जाईल. घरातील सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. सर्वजण क्वारंटाइनमध्ये आहेत’, अशी माहिती  करिम मोरानी यांनी ‘पीटीआय’ला दिली.करिम हे 'रा. वन', 'चेन्नई एक्स्प्रेस', 'हॅप्पी न्यू इअर' आणि 'दिलवाले' या चित्रपटांचे निर्माते आहेत.

अभिनेता अर्जुन कपूर अशी करणार मदत