पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विकीनं मानले महाराष्ट्र सरकारचे आभार, ५०० चित्रपटगृहात 'उरी..' मोफत

उरी : द सर्जिकल स्ट्राइक

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट 'कारगिल विजय दिना' निमित्तानं पुनर्प्रदर्शित करण्यात आला आहे. आज 'कारगिल विजय दिना' निमित्तानं महाराष्ट्रातील ५०० चित्रपटगृहात हा चित्रपट मोफत असणार आहे. यासाठी विकीनं महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. 

कारगिल विजय दिवस : कारगिल युद्धापासून प्रेरित हे चार बॉलिवूड चित्रपट 

'कारगिल विजय दिना'निमित्तानं उरी : द सर्जिकल स्ट्राइक  महाराष्ट्रात पुनर्प्रदर्शित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला ही माझ्यासाठी अभिमानची बाब आहे.  महाराष्ट्र सरकारने पाठिंबा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असं विकीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महाराष्ट्रातील चित्रपटगृहात १८ ते २५ वयोगटातील मुलांसाठी हा शो मोफत दाखवण्यात यावा यासाठी ग्राहक संरक्षण, माजी सैनिक कल्याणमंत्री यांनी यासंदर्भात पत्र लिहिले होते.  राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृद्धींगत व्हावा याकरीता २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात या चित्रपटाचं मोफत आयोजन करण्यात येणार असल्याचं निलंगेकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रातील ५०० चित्रपटगृहात मोफत दाखवण्यात आला आहे. 

'इंशाअल्लाह'मध्ये सलमान- आलियासोबत दिसणार आणखी एक अभिनेत्री?

'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. उरीमधील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्याचा  भारतानं सर्जिकल स्ट्राइक करत सूड घेतला. भारतीय जवानांच्या धाडसाची आणि शौर्याची कथा या चित्रपटात दाखवली आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kargil Vijay Diwas Uri The Surgical Strike Free Show Vicky Kaushal write thankful message for Maharashtra State Government