पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कारगिल विजय दिवस : कारगिल युद्धापासून प्रेरित हे चार बॉलिवूड चित्रपट

कारगिल विजय दिवस

कारगिल विजयाला तोड नाही, या युद्धाचं महत्त्व हे  खूपच वेगळं आहे. हाडं गोठणारी थंडी, शत्रूबरोबरच निसर्गाच्या भयानक रुपाशीही दोन हात करत भारतीय सैनिक  लढले, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्यानं कारगिल विजय साकारला. पाकिस्तानी सैनिकांना टायगर हिल्सपासून अक्षरश: पळवून लावलं आणि भारताचा तिरंगा अभिमाननं फडकवला. या घटनेला आज वीस वर्ष पूर्ण झाली. 

'इंशाअल्लाह'मध्ये सलमान- आलियासोबत दिसणार आणखी एक अभिनेत्री?

भारताचा हा विजय कौतुकास्पद होता, या युद्धात लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाची कथा ही प्रेरणादायी अशीच आहे. या युद्धापासून प्रेरणा घेत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आले. या चित्रपटातून कारगिल युद्धाची कहाणी  घराघरात पोहोचली. हे चित्रपट कोणते ते पाहू. 

LOC कारगिल 
जे.पी. दत्ता दिग्दर्शित LOC कारगिल  चित्रपट  २००३ मध्ये प्रदर्शित झाला. संजय दत्त, अय्युब खान, सुनील शेट्टी, सैफ अली खान आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. भारतीय सैन्यानं अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे युद्ध जिंकलं या युद्धाची कथा घराघरांत पोहोचलीच पाहिजे असं जे.पी. दत्ता म्हणाले होते. या चित्रपटात खऱ्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. बॉलिवूडमधील सर्वाधिक कलावधीचा चित्रपट म्हणूनही LOC कारगिल ओळखला जातो. या चित्रपटाचा एकूण कालावधी हा चार तास पंधरा मिनिटे होता.  

LOC कारगिल

लक्ष्य
आयुष्यात कोणतंही ध्येय नसलेला मुलगा भारतीय सैन्यात दाखल होतो आणि त्याचं आयुष्य कसं पूर्णपणे बदलून जातं यावर आधारलेला हा चित्रपट आहे. हृतिक रोशन, प्रिती झिंटा यांची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. लक्ष्यसाठी सर्वाधिक उंचावरुन क्रेनच्या सहाय्यानं एका दृश्य चित्रीत करण्यात आलं होतं. या चित्रपटाची कथा ही  कारगिल युद्धावरूनच प्रेरित आहे. 

लक्ष्य

धूप 
कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्ट अनुज नय्यर यांच्यावर आधारित धूप चित्रपट २००३ प्रदर्शित झाला. अनुज यांनी  भारतमातेच्या संरक्षणासाठी दिलेला लढा आणि त्यांच्या निधनानंतर कुटुंबाला सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या परिस्थितीवर हा चित्रपट आधारलेला आहे. 

धूप

स्टंप्ड 
कारगिल युद्ध आणि क्रिकेट विश्वचषक अशा दोन्ही घटनांचा आधार  घेत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. रविना टंडनची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात तिनं एका सैनिकाच्या पत्नीची भूमिका  साकारली आहे. युद्धादरम्यान तिचे पती बेपत्ता होतात. त्यावेळी विश्वचषकही सुरू होता, एकीकडे भारताच्या संरक्षणासाठी जवान लढत होते तर दुसरीकडे देशातल्या अनेकांना क्रिकेटमध्ये अधिक रस होता. हाच विरोधाभास सांगणारी कथा स्टंप्ड मध्ये आहे.

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेत