करिना कपूरचे या वर्षांत 'गुड न्यूज', 'तख्त' आणि 'हिंदी मिडिअम' असे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चित्रपटाबरोबर काही महिन्यांपूर्वी करिनानं रॅडिओ चॅट शो देखील होस्ट केला होता. आता रुपेरी पडद्यावरची ही अभिनेत्री छोट्या पडद्यावरही पदार्पण करत आहे. ती डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोची जज असणार आहे.
मात्र परीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी तिनं १५ दिवस विचार केला होता. कामाच्या तासाची मला सर्वाधिक भीती वाटत होती. मी जास्तीत जास्त आठ तास काम करू शकते. आठ तासांच्या वर काम करणार नाही हे मी आधीच स्पष्ट केलं होतं. हा निर्णय मी माझा मुलगा तैमुरसाठी घेतला. निर्माते या गोष्टीसाठी तयार झाले आणि बऱ्याच गोष्टी जुळून आल्यात म्हणूनच मी टीव्हीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला' असल्याचं करिना मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.
करिना या शोच्या परीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारण्यास खूपच उत्सुक होती. १० वर्षांपासून हा शो सुरू आहे या शोचा भाग होण्यास मी खूपच उत्सुक होते असंही ती म्हणाली.