पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करिना- आमिर येणार एकत्र?

आमिर खान- करिना कपूर

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लवकरच त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट ग्रम्प'चा रिमेक असलेल्या या चित्रपटाची कथा अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे. ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणाला सुरूवात होईल. या चित्रपटात अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार अशा चर्चा आहेत. 

या खेपेला आपला दु:खद अंत होणार नाही, दीपिकाच्या पोस्टवर रणवीरची मजेशीर प्रतिक्रिया

मीड डेच्या माहितीनुसार या चित्रपटात करिनाची वर्णी लागू शकते. करिनानं या चित्रपटात भूमिका साकारावी अशी आमिरची इच्छा आहे. मात्र  अंग्रेजी मीडिअमच्या चित्रीकरणासाठी करिना ही लंडनमध्ये आहे. ऑगस्टपर्यंत हे चित्रीकरण सुरू राहणार आहे. याच  व्यतिरिक्त करिना एका रिअॅलिटी शोची परिक्षक म्हणूनही काम पाहणार आहे. तिचं वेळापत्रक तुर्त व्यग्र आहे. त्यामुळे तिच्या होकाराची प्रतीक्षा आता आमिरला आहे.
करिना आणि आमिर ही जोडी पहिल्यांदा 'थ्री इडियट'मध्ये दिसली होती. त्यानंतर 'तलाश' चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे करिनानं जर होकार  दिला  तर तिसऱ्यांदा ही जोडी एकत्र दिसेन. 

नातं संपलं म्हणून बलात्काराचे आरोप करून चालत नाही, आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनाला टोला

करिनाचं या वर्षांचं वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. ती 'अंग्रेजी मिडियम', 'गूड न्यूज' आणि 'तख्त' अशा चित्रपटात दिसणार आहे.