पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करिना होणार सैफची एक्स गर्लफ्रेंड?

सैफ करिना

'टशन', 'कुर्बान', 'ओमकारा' ' एजंट विनोद' या चित्रपटात करिना आणि सैफची जोडी एकत्र दिसली होती. आता सैफसोबत करिना 'जवानी जानेमन' या चित्रपटातदेखील झळकणार आहे. करिना या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची चर्चा आहे. डेक्कन क्रोनिकलच्या माहितीनुसार या चित्रपटात करिना सैफच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. 

हृतिकचं कुटुंब सुनैनाला मारहाण करतं, कंगनाच्या बहिणीचा आरोप

सध्या सैफ इंग्लडला असून तो  'जवानी जानेमन'  चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. या चित्रपटामधून पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. तर करिना ही सैफच्या एक्स गर्लफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. 

माझा कंगनालाच पाठिंबा, हृतिकच्या बहिणीची कबुली

करिना देखील तिच्या आगामी 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचं चित्रीकरण इंग्लडमध्ये  करत आहे. त्यामुळे हे चित्रीकरण पार पडल्यानंतर करिना 'जवानी जानेमन'च्या चित्रीकरणावर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. यापूर्वी सैफच्या 'हॅप्पी एंडिग' चित्रपटात करिना पाहुण्या कलाकाराच्या  भूमिकेत झळकली होती.