पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लाल सिंग चड्ढा'साठी करिनाचा आमिरला होकार

आमिर खान

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान लवकरच त्याच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. या  चित्रपटात  आमिरची अभिनेत्री कोण असेन याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर करिनाची चित्रपटासाठी वर्णी लागली आहे. करिनानं आमिरला 'लाल सिंग चड्ढा' साठी आपला होकार कळवला आहे. 

'कबीर सिंह' च्या स्क्रीनिंगसाठी एक्स कपल हरलिन- विकीची उपस्थिती

आमिर आणि करिना ही जोडी पहिल्यांदा 'थ्री इडियट'मध्ये दिसली होती. त्यानंतर 'तलाश' चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केलं होतं. ही जोडी  प्रेक्षकांना खूपच आवडली होती. आता करिनानं होकार दिल्यानंतर 'लाल सिंग चड्ढा'च्या निमित्तानं  तिसऱ्यांदा ही जोडी एकत्र दिसणार आहे. 
करिनानं या चित्रपटात भूमिका साकारावी अशी आमिरची इच्छा होती. मात्र करिनाचं व्यग्र वेळापत्रक पाहता ती होकार देईन की नाही याबद्दल 'लाल सिंग चड्ढा'ची टीम साशंक होती. अखेर करिनानं आपला होकार कळवला आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट ग्रम्प'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची कथा अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे. 

'बिग बॉस'च्या घराबाहेर काढण्यासाठी राजकीय कट रचला, बिचुकलेंचा आरोप

ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. २०२० मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या करिनाचं वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. ती 'अंग्रेजी मिडियम', 'गूड न्यूज' आणि 'तख्त' अशा चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तिनं डान्स इंडिया डान्स या शोची जबाबदारीही स्वीकारली आहे. या व्यतिरिक्त ती सैफ अली खानसोबत  'जवानी जानेमन' या चित्रपटातही झळकणार आहे.