पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय- नाही करत अखेर 'बेबो' इन्स्टाग्रामवर दाखल

करिना कपूर खान इन्स्टाग्रामवर दाखल

सोशल मीडिया ही आजच्या काळाची गरज आहे. जगभरातील अनेक कलाकार ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपल्या कोट्यवधी चाहत्यांशी जोडले गेले आहेत.  मात्र सोशल मीडियापासून चार हात लांब राहणारी अभिनेत्री करिना कपूर खान होय- नाही करत अखेर इन्स्टाग्राम  या जगप्रसिद्ध फोटो शेअरिंग अॅपवर दाखल झाली आहे. 

तारखाच उपलब्ध नसल्यानं 'मिस्टर लेले'चं चित्रीकरण रद्द

करिना कपूर ही गेल्या २० वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. मात्र ती सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नाही. तिला याबाबत अनेकदा प्रश्न विचारले मात्र मला या व्यासपीठाच्या आहारी जायचे नाही अशी भूमिकाच तिनं कायम ठेवली. पण अखेर तिनं इन्स्टाग्रामवर सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी ती इन्स्टाग्रामवर दाखल झाली. पहिल्या काही मिनिटांत तिच्या फॉलोवर्सची संख्या ३ लाखांपेक्षाही अधिक होती. तिच्या फॉलोवर्सची संख्या मिनिटामिनिटाला वाढत चाललेली पहायला मिळत आहे. 

मृण्मयीची बहीण नव्या मालिकेत, शेअर केला पहिलावहिला अनुभव

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Coming soon...

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

 ''कोणत्याही गोष्टीला कधी नाही बोलू नये यावर मी  नेहमीच विश्वास ठेवते. मला इन्स्टाग्रामच्या आहारी जायचे नव्हते किंवा माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची माहिती मला लोकांना द्यायची नव्हती म्हणून मी यापासून दूर राहिले होते मात्र तुम्हाला वेळेनुसार बदललं पाहिजे याची जाणीव मला होवू लागली आहे, असं करिना मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

‘मीडियम स्पाइसी’तून ४० वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतणार ही अभिनेत्री