पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा : कपूर बहिणींची महाराष्ट्रास मदत

करिना- करिष्मा कपूर

पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी सढळ हस्ते मदत केली आहे. कोरोनाविरोधात लढाईसाठी सरकारला मदत करण्यासाठी कलाकारांनी मदतनिधी जाहीर करून खारीचा वाटा उचलला आहे. बॉलिवूडच्या लोकप्रिय कपूर बहिणींनीही निधी देऊ केला आहे. 

भीषण अपघातातून बचावला होता अब्दुला, आठवणीत खान कुटुंबीय भावूक

अभिनेत्री करिष्मा कपूर तिची मुलं, लहान बहिण करिना कपूर, करिनाचा पत्नी सैफ अली खान या तिघांनीही पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र निधीचा आकडा त्यांनी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We donated , please donate too.. a small contribution can help so many lives..🙏🏼 #indiafightscorona #jaihind🇮🇳

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करिष्मा कपूर  आणि करिना- सैफनं आपली मदत ट्विटरद्वारे जाहीर केली आहे तसेच त्यांनी इतरांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत अक्षय कुमारनं २५ कोटींची मदत दिली आहे. तर लता दीदींनी २५ लाखांची मदत केली आहे. अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट, सारा अली खान, अमृता खानविलकर,  सोनाली कुलकर्णी, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींनी आर्थिक मदत देऊ केली आहे. तर अभिनेत्यांपैकी सलमान खान, कार्तिक आर्यन, विकी कौशल, राजकुमार राव यांसारख्या कलाकारांची नावं पुढे आली आहेत. 

अभिनेत्री प्राजक्ताचे १० वर्षे जुने Photos पाहिलेत का?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

🙏🏻🙏🏻

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on