पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढदिवसासाठी तैमुरनं आई करिनाकडून मागितलं हे गिफ्ट

करिना- तैमुर

बॉलिवूड कलाकार करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर अली खान पुढील आठवड्यात तीन वर्षांचा होत आहे. सोशल मीडियावर तैमुर इतकी प्रसिद्धी क्वचितच एका स्टार किड्सला लाभली असेल. 

मुलाचं नाव तैमूर का ठेवलं, सैफनं सांगितलं कारण

२० डिसेंबरला तैमुर तीन वर्षांचा होत आहे. तैमुरच्या दुसऱ्या वाढदिवशी करिनाचं कुटुंब परदेशात होतं. एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी  हे कुटुंब परदेशात होतं. मात्र आता तैमुरचा वाढदिवस मुंबईत साजरा होणार आहे. विशेष म्हणजे वाढदिवसासाठी तैमुरनं आईकडे खास गिफ्ट मागितलं आहे. तैमुरनं वाढदिवसासाठी भेट म्हणून आमच्याकडे दोन केक मागितले आहेत. त्याला एक सांताक्लॉजचा तर दुसरा हल्कचा केक हवाय, असं करिना टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाली. 

क्वीन नाकारल्याचा पश्चात्ताप नाही - करिना

त्याचे  ८- १० मित्र मैत्रीण आणि संपूर्ण कुटुंब वाढदिवसाला येईल असं करिना म्हणाली. सध्या करिना तिच्या 'गूड न्यूज' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती लवकरच आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.