पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तैमुरच्या चित्रपट पदार्पणाविषयी करिना म्हणते...

तैमुर

करिना कपूर खानचा मुलगा तैमुर हा नेहमीच सोशल मीडियावर  चर्चेत असतो.  क्वचीतच एका सेलिब्रिटी मुलाला लाभली असेन इतकी प्रसिद्धी तैमुरला लाभली आहे. तैमुर हा 'गुड न्यूज' या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसेन अशा चर्चा  होत्या. मात्र या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं  करिनानं स्पष्ट केलं आहे.  

मुंबईतील दर्ग्यात दर्शनास पोहोचले कार्तिक आणि सारा
 

तैमुर लहान आहे. तो कोणत्याही चित्रपटात झळकणार नसल्याचं करिनानं मिड डेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.  करिना कपूर, अक्षय कुमार, दिलजित दोसांज, किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला 'गुड न्यूज'  चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तैमुरदेखील दिसणार असल्याच्या चर्चा  कित्येक महिन्यांपासून होत्या.  मात्र सध्या तैमुरला चित्रपटात आणण्याचा  कोणताही विचार नसल्याचं करिनानं स्पष्ट केलं आहे. एका जाहिरातीत तो करिना आणि सैफ अली खानसोबत दिसला होता. 

जाणून घ्या 'भारत'ची बॉक्स ऑफिसवरील कमाई

करिना 'गुड न्यूज'  बरोबरच 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण सद्या सुरू असून ती याच चित्रपटासाठी लंडनाला  गेली असल्याचं समजत आहे.  चित्रपटाबरोबरच करिना 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोची जज देखील असणार आहे. या रिअॅलिटी शोमधून करिना छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याचं  समजत आहे.