पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करिना म्हणते, मानधनातील तफावतीमुळे कधीही चित्रपट सोडला नाही

करिना कपूर

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या आणि समान पातळीवर असलेल्या महिला-पुरुष कलाकारांना  समसमान वेतन मिळालं पाहिजे, यासाठी अनेक अभिनेत्री आग्रही आहेत. समसमान  वेतनासाठी आग्रही असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोन सारख्या अभिनेत्रींनी यावर रोखठोक मत मांडलं आहे. 

'वॉर' आणि 'जोकर' प्रियांकावर पडले भारी

काही दिवसांपूर्वी दीपिकानं मानधनातील असमानतेमुळे चित्रपट नाकारला होता. अभिनेत्री करिना कपूर हिला जिओ मामी मुंबई मेला मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. असमान वेतनामुळे नाराज होऊन चित्रपटातून तू कधी काढता पाय घेतला आहेस का? असा प्रश्न करिनाला विचारण्यात आला होता.

झी मराठी अवॉर्ड्स : या मालिकेनं यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मारली बाजी

यावर करिनानं उत्तर दिलं आहे. मी अनेक कारणांमुळे चित्रपट सोडले असतील मात्र मानधनातील तफावतीमुळे कधीही चित्रपट सोडण्याची वेळ माझ्यावर आली नाही असं करिना म्हणाली. मात्र चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेता- अभिनेत्रींना समान वेतन मिळालं पाहिजे याबद्दल तिनं आग्रह व्यक्त केला.