पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'प्रत्येक चित्रपटात तुझ्यासोबत रोमान्स करण्याची संधी मिळाली असती तर'

लाल सिंग चड्ढा

आमिर खान यानं 'व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधून 'लाल सिंग चड्ढा' या त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री करिनाचा पहिला लूक शेअर केला आहे. 'तलाश', '३ इडियट्स'नंतर तिसऱ्यांदा करिना- आमिर एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे ही जोडी प्रेक्षकांना आवडली आहे. करिनासोबत येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात रोमान्स करण्याची संधी मिळाली तर.. अशी इच्छाही आमिरनं व्यक्त केली आहे. 

'सासूबाईं'ना जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्याकडून कामाची पोचपावती

'पा लेने की बेचैनी, और खो देने का डर...
बस इतना सा है, ज़िंदगी का सफर' असं लिहित आमिरनं चित्रपटातील करिनाचा पहिलाचा लूक शेअर केला आहे. केवळ 'लाल सिंग चड्ढा'च नाही तर येणाऱ्या अनेक चित्रपटांत करिनासोबत काम करण्याची इच्छा आमिरनं व्यक्त केली आहे.

'लाल सिंग चड्ढा' चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. पुढील वर्षी ख्रिस्मसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. देशातल्या विविध शहरात या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे. अतुल कुलकर्णीनं या चित्रपटाची कथा लिहिली आहे. 

आजारपणानंतर इरफान पहिल्यांदाच चित्रपटात, अंग्रेजी मीडियम ट्रेलर लाँच