अभिनेत्री करिना कपूरही बऱ्याच वर्षांनंतर आमिर खान सोबत काम करताना दिसणार आहे. आमिर आणि करिनानं 'थ्री इडियट्स', 'तलाश' चित्रपटात काम केलं होतं. 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाच्या रुपानं ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सोमवारी चित्रीकरणासाठी करिना अमृतसरमध्ये पोहोचली, पण चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी करिनानं सूवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
अनुराधा पौडवाल यांच्या घरी चोरी, पुजाऱ्यांनी चोरले ७ लाखांचे दागिने
'लाल सिंग चड्ढा' च्या चित्रीकरणाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात झाली. मात्र करिनासोबत चित्रीकरण या महिन्यापासून सुरू होणार आहे. पण तत्पुर्वी करिनानं आपल्या मॅनेजरसोबत सूवर्ण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.
गेल्याच आठवड्यात 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमिर खानही दर्शनासाठी मंदिरात आला होता. 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प' चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. पुढील वर्षी ख्रिस्मसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. देशातल्या विविध शहरात या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.
तुझ्यात जीव रंगला :सेटवर पूजा करून केला १००० भागांच्या यशाचा आनंद