पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आर. के. स्टुडिओच्या विक्रीवर करिना म्हणते...

करिना कपूर खान

राज कपूर यांनी १९४८ साली आर. के. बॅनर सुरू  करताना चेंबूर येथे आर. के. स्टुडिओची उभारणी केली होती. या स्टुडिओला ७१ वर्षांचा इतिहास आहे. आर.के. बॅनरच्या बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण आर. के. स्टुडिओतच  झाले. काही दिवसांपूर्वी  हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीनं  कपूर कुटुंबीयांकडून खरेदी केला. आता या ठिकाणी आलिशान निवासी संकुल उभं राहणार आहे. करिना कपूर हिला आर. के. स्टुडिओबद्दल विचारण्यात आलं. या स्टुडिओच्या विक्रीवर तिनं आपलं मत मांडलं आहे. 

' राज कपूर यांचा वारसा आम्ही पुढे नेणार आहोत. करिश्मा, त्यानंतर मी आणि रणबीरनं त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आमच्या अभिनयातून, चित्रपटातून, कामातून आम्ही हा वारसा जपतोय आणि पुढे नेतोय. आमची मुलं देखील भविष्यात हा वारसा  पुढे नेतील अशी मी आशा करते' असं करिना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. आर. के. स्टुडिओचं अस्तित्त्व हे फक्त जमीनीवर उभ्या असलेल्या वास्तूपुरता मर्यादीत नसून ते तो अभिनयात आणि कामातही वसला आहे असं करिनाचं मत आहे.

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेनं या आर. के. स्टुडिओमध्ये राज कपूर यांचं संग्राहलय उभारा अशी विनंती गोदरेज प्रॉपर्टीकडे केली होती.  भविष्यातील पीढीला राज कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल माहिती मिळेल असं  संघटनेचं म्हणणं होतं. १९४८ साली उभारण्यात आलेला  हा स्टुडिओ २०१७ पर्यंत कार्यरत होता. 'आवारा', 'बूटपॉलिश', 'जागते रहो',  'श्री ४२०' , ते १९९९ साली प्रदर्शित झालेल्या  'आ अब  लौट चले' चित्रपटाची निर्मिती या बॅनर अंतर्गत करण्यात आली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Kareena Kapoor Khan says that her sister Karisma and cousin Ranbir Kapoor are taking RK Studio legacy forward