पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डान्स इंडिया डान्स'च्या प्रत्येक एपिसोडसाठी करिनाला सर्वाधिक मानधन?

करिना कपूर खान

करिना कपूर खान ही  'डान्स इंडिया डान्स' या प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकपदी विराजमान झाली आहे. या शोद्वारे ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पाऊल ठेवत आहेत. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी करिना ३ कोटींचं मानधन घेत असल्याचं समजत आहे. 

करिना गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. तिथे 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. या चित्रीकरणातून वेळ काढून करिना काही तासांसाठी लंडन ते मुंबई असा प्रवास करते. या डान्स शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी तिला ३ कोटींचं मानधन दिलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 

त्या फोटोमुळे प्रियांका Global Social Media Climbers Chart मध्ये अव्वल

छोट्या पडद्यावरील शोसाठी एका चित्रपट अभिनेत्रीला दिलं गेलेलं हे सर्वाधिक मानधन असल्याचं म्हटलं जात आहे. करिना ही सध्याच्या घडीला चित्रपटविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सध्या 'तख्त', 'गुड न्यूज', 'अंग्रेजी मीडियम' आणि 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. करिनाचं वेळापत्रक खूपच व्यग्र आहेत. मात्र  'डान्स इंडिया डान्स' साठी ती  वेळात वेळ काढून लंडन मुंबई असा प्रवास करत आहे. 

एका पुरुष परीक्षकाला सर्वाधिक मानधन दिलं जातं, मग महिला परीक्षकाला जास्त मानधन दिल्यास काय हरकत आहे? मी या शोसाठी मेहनत घेतली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मेहनतीचं योग्य फळ हे मिळालंच पाहिजे असं करिना पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.