पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पती सैफसोबत करिना करणार या चित्रपटात काम?

करिना- सैफ

'टशन', 'कुर्बान', 'ओमकारा' या चित्रपटात करिना आणि सैफची जोडी एकत्र दिसली होती. 'ओमकारा' चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. त्यानंतर एक कॅमिओ रोल  आणि जाहिरात वगळता ही जोडी ऑनस्क्रीन दिसली  नाही. मात्र सैफच्या आगामी चित्रपटात कदाचित करिना झळकण्याची शक्यता आहे. 

मी पाकिस्तानी संघाची आई नाही, विणावर भडकली सानिया मिर्झा

सैफचा 'जवानी जानेमन' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात करिना दिसण्याची शक्यता आहे. करिना या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ सध्या इंग्लडमध्ये आहे. करिना देखील तिच्या आगामी 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचं चित्रीकरण तिथेच करत आहे. त्यामुळे हे चित्रीकरण पार पडल्यानंतर करिना 'जवानी जानेमन'च्या चित्रीकरणावर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. यापूर्वी सैफच्या 'हॅप्पी एंडिग' चित्रपटात करिना पाहुण्या कलाकाराच्या  भूमिकेत झळकली होती. 

'आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करत नाही'

 २०१९ मधलं करिनाचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र आहे. करिना ही 'अंग्रेजी मीडियम',  'गूड न्यूज', 'तख्त' यांसारख्या चित्रपटात झळकणार आहे. पण त्याचबरोबर एका रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची जबाबदारीही  तिनं स्विकारली आहे.