पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

video : भावाच्या लग्नातला करिना-करण- करिष्माचा 'बोले चुडिया' डान्स व्हायरल

करिना-करण- करिष्माचा  'बोले चुडिया' डान्स व्हायरल

अभिनेत्री करिना कपूर, करिश्माचा भाऊ अरमान जैनचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधले कपूर कुटुंबीयांच्या जवळचे कलाकार उपस्थित होते. तर मंगळवारी रात्री मुंबईतल्या आलिशान हॉटेलमध्ये  अरमान जैनचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. या रिसेप्शन  पार्टीसाठी बॉलिवूडमधले अनेक मोठे तारे- तारका उपस्थित होते. 

 

VIDEO : भावाच्या वरातीत करिना- करिश्माची धम्माल मस्ती

विशेष म्हणजे पार्टीमध्ये करिना-करण- करिष्मा यांनी 'बोले चुडिया'  या गाण्यावर केलेला डान्स खूपच व्हायरल होत आहे. करिना आणि दिग्दर्शक करण जोहरचं नातंही बहिण भावाचं आहे.  या तिघांनी रिसेप्शन पार्टीत नव्या सुनेचं  स्वागत एका छान डान्स सादरीकरणानं केलं. करिना- करणच्या 'कभी खुशी कभी गम ' चित्रपटातलं हे प्रसिद्ध गाणं होयं.

PHOTOS : भावाच्या रिसेप्शन पार्टीत आलिया- रणबीरची चर्चा

तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानच्या डान्सचीही चर्चा पहायला मिळाली. शाहरूख गौरीनं रिसेप्शन पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. शाहरूखनं पत्नी गौरीसोबत 'कजरा रे' वर डान्सदेखील केला.

PHOTOS : करिनाच्या भावाच्या लग्नात कलाकारांची मांदियाळी