बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर खानचा आज वाढदिवस आहे. करिना कपूरने पतौडी हाऊसमध्ये कुटुंबियांसोबत आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. करिनाच्या वाढदिवसानिमित्त पतौडी हाऊसला सजावट करण्यात आली होती. करिनाचा वाढदिवस साजरा केल्याचे काही फोटो करिश्मा कपूरने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तसंच, करिनाचा केक कापतानाचा व्हिडिओ सुध्दा करिश्माने इन्स्टावर शेअर केला आहे.
२०२२ मधील प्रजासत्ताक दिनाचे संचलन नव्या राजपथावर
दरम्यान, करिश्माने करिनाचा आणखी एक खास फोटो इन्स्टावर शेअर केला आहे ज्यामध्ये बेबो पती सैफ अली खानला किस करताना दिसत आहे. करिनाने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून त्यामध्ये ती खूप छान दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून बेबोला चाहत्यांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार
करिना कपूर सध्या 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोची परिक्षक आहे. डान्स इंडिया डान्सच्या सेटवर करिनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिच्या वाढदिवसानिमित्त या रिअॅलिटी शोमध्ये खास प्लानिंग करण्यात आली होती. 'डान्स इंडिया डान्स'च्या सेटवरील करिनाच्या वाढदिवसाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.