पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : भावाच्या वरातीत करिना- करिश्माची धम्माल मस्ती

भावाच्या वरातीत करिना- करिश्माची धम्माल मस्ती

अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या आतेभावाचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. या सोहळ्यासाठी 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचं संपूर्ण कुटुंबीय आणि बॉलिवूडमधले अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. सलमान खानचं कुटुंबीय, किआरा अडवाणी, करण जोहर, ट्विंकल खन्ना असे अनेक कलाकार या सोहळ्यात पहायला मिळाले. या सोहळ्यात कपूर बहिणींनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

PHOTOS : करिनाच्या भावाच्या लग्नात कलाकारांची मांदियाळी

भाऊ अरमानच्या वरातीत कपूर बहिणींनी डान्सही केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. करिनाचा मुलगा तैमुरला खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या सैफचाही आनंद कॅमेरामनच्या नजरेतून टिपला नाही. अरमान अनिषा मल्होत्रासोबत विवाहबंधनात अडकला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Baaraati Aa Gaye 🙌❤️ #SaifAliKhan #KareenaKapoor #TaimurAliKhan for #ArmaanJain wedding in Mumbai today

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

या सोहळ्यात वरातीत सर्वात पुढे असलेल्या करिना- करिश्मा या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. लग्नसोहळ्याआधी करिनानं  तैमुरसोबत केलेलं फोटोशूटही तिच्या चाहत्यांना विशेष आवडलं होतं. 
प्रेक्षकांसाठी मराठी रॅपचा 'बोनस', एकदा ऐकाच राव!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

😍😍

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on