पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्यांदाच करिनाला 'लाल सिंग चड्ढा'साठी आमिरनं द्यायला लावली ऑडिशन

करिना कपूर

अभिनेत्री करिना कपूर ही बॉलिवूडमधली  अनुभवी अभिनेत्री. गेल्या कित्येक वर्षांत बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपट दिले.  मात्र करिनाच्या बॉलिवूड करिअरमध्ये पहिल्यांदाच तिला आमिरनं चक्क  'लाल सिंग चड्ढा'साठी ऑडिशन द्यायला लावली, करिना यात यशस्वी झाल्यानंतरच आमिरनं तिची निवड केली. 

तृतीयपंथीयांच्या बालपणीची गोष्ट सांगणारा 'कोती' पुढील महिन्यांत भेटीला

करिना आणि आमिरनं 'थ्री इडियट्स', 'तलाश' सांरख्या चित्रपटात काम केलं आहे. आमिरनं मला चित्रपटाची कथा ऐकवली. माझ्याकडून काही दृश्य वाचूनही घेतली. त्यानं माझी 'लाल सिंग चड्ढा' साठी निवड केली असली तरी त्याला  स्वत:ची निवड १००% योग्य असल्याची खात्री करुन घ्यायची होती, या असं करिना  राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. करिअरमध्ये कधीही चित्रपटासाठी ऑडिशन दिल्या नाहीत असंही करिनानं कबुल केलं. 

जाणून घ्या या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन मोठ्या चित्रपटांची कमाई

आमिर खान  हा बॉलिवूडमधला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. तो  हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा अधिकृत रिमेक  'लाल सिंग चड्ढा'   प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.  या चित्रपटाची कथा अभिनेता अतुल कुलकर्णीनं लिहिली आहे. २०२० मध्ये नाताळात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.