पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माणसं किती दूष्ट असतात, करण ओबेरॉयनं सोडलं मौन

करण ओबेरॉय

अभिनेता करण ओबेरॉय बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण लाभलं आहे. या प्रकरणातील पीडित महिलेला  खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलं आहे. या महिलेनं  करणविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याचं आयएएनएस वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.  बलात्कार प्रकरणात करणला गेल्याच आठवड्यात जामिन मंजूर केला. करणनं आता त्याच्याविरोधात झालेल्या सर्व आरोपांविषयी मौन सोडलं आहे. 

'माणूस किती दृष्ट असू शकतो याचा अनुभव मी घेतला. हा केवळ गुन्हा आहे मला आता स्वत:च्या, माझ्या बहिणीच्या आणि मित्रपरिवाराच्या सुरक्षेची काळजी वाटू लागली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर  माझी आई मला घराबाहेर पाऊलही टाकू देत नसल्याचं करण आयडब्ल्यूएम बझला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

'आम्ही एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा करत नाही'
 

सोमवारी बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेला पोलिसांनी अटक केली. संबधित महिलेनं २५ मे रोजी ओशिवरा पोलिस स्थानकात खोटी तक्रार दाखल केली होती. दोन अज्ञात व्यक्तीनं करण ओबेरॉयवरची  केस मागे घे नाहीतर अॅसिड हल्ला करू  अशी धमकी आपल्याला दिली असल्याची तक्रार संबधीत महिलेनं  केली होती. या प्रकरणाचा तपास करताना हल्ल्याचा कट पीडित महिलेच्या वकिलानेच रचला असल्याचं समोर आलं होतं. या कटात तिचाही सहभाग असल्यानं पोलिसांनीही तिलाही अटक केली होती. 

बॉक्स ऑफिसवर 'मोगरा फुलला', तीन दिवसांत तापसीचा 'गेम ओव्हार'

'पीडित  महिलेनं जी तक्रार माझ्याविरोधात दाखल केली त्यामुळे माझे आई वडिल पूर्णपणे कोसळले. या सर्वांचा त्रास माझ्या वडिलांना अधिक झाला. गेले एक महिना माझी आई केवळ रडत होती. माझं कुटुंब हे  सैन्यातलं आहे, माझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी या देशाची सेवा केली आहे. मी कधीही साधा वाहतुकीचा नियम मोडला नाही, ना कोणासोबत चढ्या आवाजानं बोललो ' त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबीयांना याचा सर्वाधिक त्रास झाला असल्याचं करण ओबेरॉय या मुलाखतीत म्हणाला.