पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तख्त'साठी करण जोहरनं मोजले तब्बल २५० कोटी?

तख्त

दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हा 'तख्त' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मुघल साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पान 'तख्त' च्या निमित्तानं उलगडणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधले अत्यंत महत्त्वाचे कलाकार पहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या ऐतिहासिक चित्रपटासाठी २५० कोटींचं बजेट असणार आहे. 

सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली'मध्ये दिसणार ही अभिनेत्री

'तख्त'मध्ये रणवीर सिंग, करिना कपूर खान, विकी कौशल, भूमि पेडणेकर,  अनिल कपूर, जान्हवी कपूर यांसारखे कलाकार पहायला मिळणार आहेत. गेल्यावर्षी  करण जोहरनं 'तख्त' चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटातील अनेक कलाकार हे सध्याच्या घडीला बॉलिवूडमधले आघाडीचे कलाकार आहेत.

video : पूजा- गश्मीरच्या ‘बोनस’चा ट्रेलर पाहिलात का?

त्यातील अनेक कलाकारांचे मानधन हे सर्वाधिक आहे. त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मानधन देण्याचा निर्णय करणनं  घेतला आहे. शिवाय हा ऐतिहासिक पट आहे त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवरही  सर्वाधिक खर्च करण्यात येणार आहे.