पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कुछ कुछ होता है' च्या रिमेकसाठी त्या तीन कलाकारांनाचं घ्यावं, करणची इच्छा

कुछ कुछ होता है

निर्माता करण जोहरचा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटले  तरी राहुल, अंजली, टीनाची प्रेमकथा कित्येक प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. नुकताच इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी निर्माता, दिग्दर्शक करण जोहरही उपस्थित होता.

कोल्हापूर- सांगली पूरग्रस्तांना अक्षय कुमारचा भावनिक संदेश, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

भविष्यात या चित्रपटाचा रिमेक झाला तर आलिया, रणवीर सिंह आणि जान्हवी कपूर यांच्या नावाचा विचार नक्की करेन अशी इच्छा करणनं फिल्म फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केली. रणवीर सिंह शाहरूखनं साकारलेली राहुलची भूमिका उत्तम निभावू शकतो अशी मला खात्री आहे. म्हणून 'कुछ कुछ होता है' च्या रिमेकमध्ये राहुलच्या  भूमिकेसाठी रणवीरच्या नावाला प्राधान्य असेन असं करण म्हणाला. 

हा आहे दिशाचा 'फिटनेस मंत्र'

तर अंजलीच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट हिला प्राधान्य देईन असंही त्यानं सांगितलं. अंजलीची भूमिका काजोलनं साकारली होती. तर टीनाच्या भूमिकेत जान्हवी शोभून दिसेन असं मत त्यानं व्यक्त केलं आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Karan Johar wants Janhvi Kapoor Alia Bhatt and Ranveer Singh in Kuch Kuch Hota Hai reboot