पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जान्हवी - कार्तिकसोबत हा टीव्ही अभिनेता 'दोस्ताना २'मध्ये

दोस्ताना २

जून महिन्यात निर्माता करण जोहरनं 'दोस्ताना २'ची घोषणा केली होती. गेल्या वर्षभरापासून 'दोस्ताना २' येणार असल्याच्या चर्चा होत्या. करणनं तेव्हा या चर्चा नाकारल्या होत्या. मात्र जूनमध्ये त्यानं 'दोस्ताना २'ची अधिकृत घोषणा करत त्यात जान्हवी कपूर आणि  कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत असतील हे जाहीर केलं. मात्र त्याचवेळी  'दोस्ताना २' मध्ये तिसरी भूमिका कोण साकारणार याची घोषणा करणनं केली नव्हती. 

अद्यापही 'दोस्ताना २' साठी तिसऱ्या अभिनेत्याचा शोध सुरू आहे असं करणनं सांगितलं त्यामुळे हा तिसरा अभिनेता कोण याची  उत्सुकता तमाम चाहत्यांना होती. अखेर यावरून पडदा उठला आहे. अभिनेता लक्ष्य हा  'दोस्ताना २'मध्ये जान्हवी - कार्तिकसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 

विसर्जन मिरवणुकीत सलमानचा हटके डान्स!, व्हिडिओ व्हायरल

लक्ष्य हा टीव्ही अभिनेता असल्याचं समजत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार लक्ष्यसोबत करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननं चार चित्रपटांसाठी करार केला आहे. लक्ष्य हा कोणत्याही सेलिब्रिटीचा मुलाना नाही ऑडिशन देऊन त्याची निवड करण्यात आली आहे असं करणनं स्पष्ट केलं आहे.

आमीर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली

२००८ मध्ये करण जोहरचा 'दोस्ताना' प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आणि त्यातली गाणी सुपरहिट ठरली होती. समलैंगिक सबंध, प्रेम, मैत्री यावर आधारित हा चित्रपट होता. मात्र या तिन्ही विषयाची मांडणी करणनं अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीनं केली होती. त्याला विनोदाचा अन् रोमान्सचा तडका होता. प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम या तिघांची प्रमुख भूमिका या चित्रपटात होती. ११ वर्षांचा काळ लोटला तरी या चित्रपटातील 'देसी गर्ल' गाणं हे आजही तितकंच सुपरहिट आहे. या गाण्यानंतर प्रियांका खऱ्या अर्थानं 'देसी गर्ल' हे बिरुद मिरवू लागली. डिसेंबर २०१८ पासून या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा होत्या.