पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, करणनं अखेर सोडले मौन

करण जोहर पार्टी

दिग्दर्शक करण जोहरनं काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत  आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. हे सर्व कलाकार अमली पदार्थांच्या नशेत होते. असा आरोप अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा यांनी केला होता. या सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण खूपच तापलं होतं.

'भूल भुलैया २' या तारखेला होणार प्रदर्शित

या आरोपांवर पहिल्यांदाच करणनं मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत करणनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'गेल्या काही दिवसांपासून कलाकार कामात व्यग्र होते. कामातून वेळ काढून कलाकार चांगला वेळ व्यतीत करत होते. पार्टीत चुकीची गोष्ट करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यातला  मूर्ख मी नाही.  विकीला डेंग्यू झाला होता. आजारपणातून तो बाहेर पडत होता. त्याच्या हातात लिंबू पिळलेलं गरम पाणी होतं. हा व्हिडीओ चित्रीत करण्याआधी आमच्यासोबत माझी आईही होती. आम्ही अमली पदार्थांच्या नशेत होतो हे आरोप तत्थहिन आहेत, म्हणूनच या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचं मी ठरवलं होतं.', असं करण जोहर म्हणाला. 

कलम ३७० : झायराशी संपर्क तुटल्यानं दिग्दर्शिका सोनाली बोस काळजीत