दिग्दर्शक, निर्माता करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इअर ३' काढणार असून या चित्रपटात तो शाहरूखची मुलगी सुहानाला संधी देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र करणनं ट्विटवर अशा कोणत्याही अफवा न पसरवण्याचं आवाहन केलं आहे.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची मागितली माफी
'स्टुडंट ऑफ द इअर ३' संदर्भात ज्या काही बातम्या पसरत आहेत त्या तत्थहिन आहेत. अशाप्रकारच्या अफवा पसरवणं थांबवावं असं करणनं म्हणलं आहे. शाहरूखची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा आहेत. करण जोहर तिला लाँच करणार असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही 'स्टुडंट ऑफ द इअर ३' मधून 'बिग बॉस १३' फेम असिम रिआझदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अशाप्रकारच्या अफवा पसरवणं थांबवावं अशी विनंती त्यानं ट्विटवर केली आहे.
या दिवशी येणार बंटी- बबली प्रेक्षकांच्या भेटीला
यापूर्वी करणनं 'स्टुडंट ऑफ द इअर'मधून आलिया भट्ट, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्राला तर 'स्टुडंट ऑफ द इअर २' मधून अनन्या पांड्ये, तारा सुतारियाला लाँच केलं होत. तर 'धडक'मधून जान्हवी कपूर आणि इशान खट्टरला लाँच केले होते.