पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

करणनं 'तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये केली कपात?

करण जोहर

'गूड न्यूज' वगळता निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटानं २०१९ या वर्षांत फारशी कमाई बॉक्स ऑफिसवर केली नाही. 'स्टुडंट ऑफ द इअर २', 'कलंक', 'ड्राइव्ह' या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटांना म्हणावं तेवढी कमाई करण्यात यश आलं नाही. त्यामुळे कंपनीला नुकसान सहन करावं लागल्याचं समजत आहे. 

तेव्हा आगामी काळात हाच फटका पुन्हा बसू नये म्हणून करणनं तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये करणनं कपात केल्याचं समजत आहे.  करणननं अनेक नव्या प्रोजेक्टनां केराची टोपली दाखवली आहे, तर  त्याच्या महत्त्वाकांक्षी 'तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्येही कपात केली असल्याची माहिती बॉलिवूड हंगामानं सुत्रांच्या हवाल्यानं प्रकाशित केली आहे. 

...म्हणून एप्रिलमध्ये हनिमूनला जाण्याचा नेहा- शार्दुलचा निर्णय

त्याचप्रमाणे २०२० यावर्षांत धर्मा प्रोडक्शनच्या कोणत्याही नव्या चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात होणार नसल्याचंही समजत आहे. दुसरीकडे करणनं आयान मुखर्जीला  'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये कपात करण्याबद्दलही सांगितलं  आहे. 'ब्रह्मास्त्र'चं दिग्दर्शन आयान मुखर्जी करत आहे. चित्रीकरणाच्या मूळ वेळापत्रापेक्षाही अधिककाळ 'ब्रह्मास्त्र'चं चित्रीकरण आयाननं लांबवलं  आहे. धर्मा प्रोडक्शनच्या इतर कोणत्याही चित्रपटाचं चित्रीकरण दीर्घकाळ लांबलं नव्हतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, नागार्जुन सारखे अनेक महागडे कलाकार आहेत, त्यांना वाढीव चित्रीकरणाचे अतिरिक्त मानधनही द्यावं लागत आहे, त्यामुळे करणनं बजेटमध्ये कपात करायला सांगितलं असल्याची माहिती सुत्रानं संबधीत साइटला दिली. 

VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....

चित्रपटासाठी वायफळ पैसे खर्च होणार नाहीत, तसेच मूळ बजेटपेक्षा निर्मितीचा  खर्च वाढणार नाही याची पुरेपुर काळजी करणनं घ्यायला सुरुवात केली आहे.