पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केवळ १२ तासांसाठी करिनाची लंडन ते मुंबईवारी

करिना कपूर

अभिनेत्री करिना कपूर खान हिचं २०१९ मधलं वेळापत्रक खूपच व्यग्र आहे. करिना ही 'अंग्रेजी मीडिअम', 'गूड न्यूज', 'तख्त'  या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त ती 'जवानी दिवानी' चित्रपटात  पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. तिनं २०२० साली प्रदर्शित होणाऱ्या  'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातही काम करावं अशी आमिरची इच्छा आहे. करिनाकडे अनेक चित्रपट आहेत. पण त्याचबरोबर 'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोमधून  ती छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या शोच्या परीक्षक पदाची जबाबदारी तिनं स्वीकारली आहे आणि हिच जबाबदारी पार पडण्यासाठी ती केवळ १२ तासांसाठी मुंबईत आली आहे. 

करिना होणार सैफची एक्स गर्लफ्रेंड?

'डान्स इंडिया डान्स' हा रिअॅलिटी शो लवकरच सुरू होत आहे. या शोच्या काही कामानिमित्त करिना लंडनहून मुंबईत आली आहे. करिना ही सध्या सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत इंग्लडला आहे. ती तिथे सुट्ट्या  व्यतीत करत आहे. त्याचबरोबर ती  अंग्रेजी मीडियअमचं चित्रीकरणही करत आहे. सुट्ट्यामधून तिनं १२ तासांचा वेळ 'डान्स इंडिया डान्स'च्या कामासाठी काढला आहे. हे काम आटपून ती लगेच लंडनला रवाना होणार आहे. 

तैमुरच्या चित्रपट पदार्पणाविषयी करिना म्हणते...

 करिनाचं यावर्षाचं वेळापत्रक हे खूपच व्यग्र आहे. मात्र तिनं या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून  'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली. हा निर्णय घेण्यासाठी मी १५ दिवस विचार केला असंही ती एका मुलाखतीत म्हणाली होती.