पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अँग्री बर्ड २' साठी कपिल देणार आवाज

अँग्री बर्ड

लोकप्रिय मोबाईल गेम  अँग्री बर्डवर काही वर्षांपूर्वी 'अँग्री बर्ड' हा चित्रपटही आला होता. आता जवळपास तीन वर्षांनतर या चित्रपटाचा सीक्वल येत आहे. इंग्रजीबरोबरच हिंदी, तामिळ आणि तेलगूमध्ये 'अँग्री बर्ड २' प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी कॉमेडियन कपिल शर्मा आवाज देणार आहे. 

द  कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोमधून कपिल लोकप्रिय झाला. कपिलची विनोदबुद्धी आणि विनोदाचं अचूक टायमिंग हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे 'अँग्री बर्ड २' च्या हिंदी व्हर्जनसाठी कपिल शर्माला विचारण्यात आलं. तो या चित्रपटातील 'रेड' या कार्टुन कॅरेक्टरसाठी आवाज देणार आहे.

मणिरत्नमच्या ऐतिहासिक चित्रपटासाठी ऐश्वर्याचा होकार

'अँग्री बर्ड २' च्या इंग्रजी व्हर्जनसाठी जेसन सूडिकिस या कॉमेडियननं आवाज दिला आहे. चित्रपटाच्या डबिंगसाठी  कपिल खूपच उत्सुक आहे.  यापूर्वी अनेक हॉलिवूड चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाले आहेत यातल्या काही चित्रपटांना बॉलिवूड कलाकारांनी आवाज दिला आहे.

सलमानमुळे बदललं नाव, मात्र 'किआरा' नावाची प्रेरणा प्रियांकापासून

'डेडपूल'साठी रणवीर सिंग, 'जंगलबुक'साठी नाना पाटेकर, प्रियांका चोप्रा, ओम पुरी यांनी तर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'दी लायन किंग'साठी शाहरूख- आर्यननं आवाज दिला आहे.