पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेक्षकांसाठी कपिल घरातून करणार 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण?

कपिल शर्मा

मनोरंजन विश्वात साधरण महिनाभरापासून चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. १९ मार्चपासून ते लॉकडाऊन संपून पुढील सूचना मिळेपर्यंत मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजचं चित्रीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. नवे भागच चित्रीत न झाल्यानं अनेक वाहिन्या जूने भाग किंवा जुन्या मालिका पुनर्प्रकाशित करत आहेत.

सुदैवानं लॉकडाऊनच्या आधी माझा मुलगा परत आला- बॉबी देओल

अशावेळी कपिलनं घरूनच 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. 'द कपिल शर्मा शो' हा भारतातल्या लोकप्रिय शोपैकी एक शो आहे. मात्र चित्रीकरण बंद असल्यानं या शोचा नवीन भाग प्रदर्शित झालेला नाही. यावर उपाय म्हणून कपिलनं घरच्या घरीच कपिल शर्मा शोचा भाग चित्रीत करण्याचं ठरवलं आहे अशी माहिती बॉलिवूड हंगामानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. 

दिलदार! अक्षय कुमारकडून बीएमसीला ३ कोटींची मदत

अमेरिकेतले प्रसिद्ध टीव्ही होस्ट सध्या हाच प्रयोग करुन पाहत आहेत, तो यशस्वीही होत आहे त्यामुळे कपिलनंही असाच प्रयोग करुन पाहण्याचं ठरवलं आहे. ही नक्कीच कपिलच्या चाहत्यांसाठी खूशखबर असणार आहे.