कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. कपिल बाबा होणार असल्याच्या चर्चा सध्या मनोरंजन विश्वात सुरू आहे. कपिलनं नुकताच पत्नी गिन्नीचा 'बेबी शॉवर'चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कपिलच्या जगभरातल्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गेल्यावर्षी डिसेंबर २०१८ मध्ये कपिल आणि गिन्नी विवाहबंधनात अडकले होते.
करिना म्हणते, मानधनातील तफावतीमुळे कधीही चित्रपट सोडला नाही
कपिलनं काही दिवसांपूर्वी गिन्नी गर्भवती असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. कपिलची आईसुद्धा गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यासोबत राहायला आली आहे. कपिल सध्या त्याच्या द कपिल शर्मा शोमध्ये व्यग्र असतो. मात्र या शोमधून वेळात वेळ काढून लवकर घरी जाण्यास कपिल सध्या प्राधान्य देत आहे.
दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स
डिसेंबर २०१८ मध्ये कपिलनं गिन्नी सोबत लग्न केलं. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली. २०१७ मध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.