पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विनोदाचा सम्राट' कपिलचं शिक्षण माहितीये?

कपिल शर्मा

विनोदाच्या अचूक टायमिंगनं जगभरातल्या तमाम प्रेक्षकांना खळखळून हसवणारा विनोचा सम्राट कपिल शर्मा याचा आज वाढदिवस. देशातल्या भल्या भल्या कॉमेडियन्सनां मागे टाकत कपिलनं विनोदाच्या क्षेत्रात ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण केलं आहे. कपिलनं कॉम्प्युटर सायन्समधून डिप्लोमा शिक्षण घेतलं आहे. तसेच त्यानं कमर्शिअल आर्टही केलं आहे.

कोरोनाशी लढा : कपूर बहिणींची महाराष्ट्रास मदत

 महाविद्यालयात असताना  शिक्षणाचा खर्च अधिक होता. मात्र कपिल हा महाविद्यालयीन काळात देखील उत्तम अभिनेता आणि विनोवीर म्हणून प्रसिद्ध होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये  कपिलसारख्या मुलानं आपल्या कॉलेजचं प्रतिनिधत्त्व करावं यासाठी काही शिक्षणसंस्थानं कपिलचा महाविद्यालयीन खर्च उचलण्याची तयारी दर्शवली होती.

भीषण अपघातातून बचावला होता अब्दुला, आठवणीत खान कुटुंबीय भावूक

कपिलच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झालं तेव्हा कपिल शाळेत होता.  वडिलांच्या  उपचारांचा खर्च उचलता यावा यासाठी कपिलनंही हातभार लावला होता. मनोरंजन विश्वात एका एपिसोडसाठी सर्वाधिक मानधन घेणारा कपिल तेव्हा पैसे कमावण्यासाठी टेलिफोन बुथवर काम करायचा. कपिल तेव्हा दहावीत होता. शाळा सुटल्यानंतर वडिलांच्या उपचारांसाठी पैसे जमवण्याकरता तो टेलिफोन बुथवर पार्ट टाइम काम करायचा.