पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कपिल म्हणतो, बाळाच्या आगमनाची माझ्यापेक्षा आईलाच सर्वाधिक प्रतीक्षा

कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशहा कपिल शर्माच्या घरी लवकरच चिमुकल्याचं आगमन होणार आहे. कपिलनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्याच आठवड्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कंगनानंही  कपिल बाबा होणार असल्याची बातमी जाहीर करत त्याला शुभेच्छा दिल्या. 

 'अँग्री बर्ड २' साठी कपिल देणार आवाज

कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ गर्भवती आहे. मुंबई मिररशी बोलताना कपिलनं या वृत्ताला दुजोरा दिला. मला माझ्या पत्नीची काळजी घेण्यात जास्त वेळ व्यतीत करायचा आहे. आम्ही दोघंही खूप उत्सुक आहोत. आमच्यापेक्षा माझ्या आईलाच बाळाच्या आगमनाची सर्वाधिक प्रतीक्षा आहे. बाळ आणि गिन्नी दोघांची तब्येत सुखरूप असावी इतकीच मी प्रार्थना करतो असं कपिल म्हणाला. गिन्नी छत्रथ गर्भवती  असल्यानं कपिलची आईसुद्धा त्यांच्यासोबत राहायला आली  आहे. ती अनेकदा कपिलसोबत द कपिल शर्मा शोच्या सेटवरही दिसते. 

मणिरत्नमच्या ऐतिहासिक चित्रपटासाठी ऐश्वर्याचा होकार

गिन्नीला अधिक वेळ देता यावा यासाठी  कपिलने त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकातही बदल केला अल्याचं  समजत आहे. कपिल रात्री उशिरापर्यंत द कपिल शर्मा शोचं चित्रीकरण करायचा मात्र आता शुटींग लवकर संपवून गिन्नीसोबत वेळ घालवायला कपिल प्राधान्य देत आहे. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना गिन्नी आणि कपिलची भेट झाली. तेव्हापासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. २०१७ मध्ये त्याने गिन्नीसोबतचा फोटो ट्विट करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.  डिसेंबर २०१८ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.