पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहाटे ३ वाजता उठून दाखव, कपिलचं अक्षयला चॅलेंज

द कपिल शर्मा शो

कपिल शर्मा आणि त्याच्या शोच्या संपूर्ण टीमनं अभिनेता अक्षय कुमारला नवं चॅलेंज केलं आहे. पहाटे ३ वाजता शूटसाठी सेटवर उपस्थित राहण्याचं आव्हान कपिलच्या टीमनं केलं आहे. कपिलनं याचा एक मजेशीर व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

महिन्याभरापूर्वी 'हाऊसफुल ४' चं प्रमोशन करण्यासाठी सकाळी लवकर अक्षय कुमार सेटवर आला होता. त्यावेळी सकाळी सातच्या आधीपासूनच 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण सुरू झालं होतं. 

नेहा पेंडसे जानेवारीमध्ये अडकणार विवाहबंधनात

आता कपिलनं चक्क पहाटे लवकर उठून तीनलाच सेटवर उपस्थित राहण्याचं आव्हान अक्षयपुढे ठेवलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल शर्माचं चित्रीकरण पूर्वी रात्री उशीरा सुरु होऊन मध्यरात्रीपर्यंत चालायचं. मात्र कपिलची पत्नी गिन्नी गर्भवती असल्यापासून कपिलनं चित्रीकरणाच्या वेळेत बदल केला.  आता दुपारी या शोचं चित्रीकरण सुरु होतं. 

या महिन्यात ख्रिस्मसला अक्षय कुमार, करिना कपूर, किआरा अडवाणी, दिलजित दोसांज यांची प्रमुख भूमिका असलेला 'गूड न्यूज' प्रदर्शत होत आहे. 

मोठे दिग्दर्शक मला कामच देत नाही, अक्षयची खंत